Type Here to Get Search Results !

नागठाणेत वैयक्तिक स्वच्छता विषयावर मार्गदर्शन व जनजागृती



माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबत जाणीव जागृती होण्याकरिता  दिनांक 14 ते 20 नोव्हेंबर हा सप्ताह बाल सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, पोलीस विभाग आणि युनिसेफ यांच्याद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत बालदिना निमीत्त नॅशनल स्टॉक एक्सचेंज फाऊंडेशन संचलीत रेडआर इंडिया यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा नागठाणे येथे मुला-मुलींना वैयक्तिक स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले.
नागठाणे येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी स्वच्छ भारत अभियानाच्या श्रीमती सारीका, श्रीमती शिल्पा, श्री. तेजस, युनेसएफचे अमित टंडन, रेडआर टीमचे सुरेश सोमण, श्री. पिनामुणीम, श्रीमती शेफाली व श्री. राजकिरण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नागठाणे गावच्या सरपंच सुरेखाताई भाडळकर व डॉ.सुनील भाडळकर यांनी स्वागत केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पाटील, श्रीमती चव्हाण व सर्व शिक्षक यांचे सहकार्य लाभले.

दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies