शेतकऱ्याच्या हस्ते आटपाडीच्या यात्रेत मसाले दूध वाटप. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 25, 2019

शेतकऱ्याच्या हस्ते आटपाडीच्या यात्रेत मसाले दूध वाटप.


माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/सचिन कारंडे :आटपाडी ग्रामदैवत उत्तरेश्वर रथोत्सव निमित्त संभाजीशेठ पाटील यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या हस्ते दूध वाटप कार्यक्रम संपन्न झाला. जेवताना शेतकऱ्याचे व झोपताना जवानाचं आभार माना असा संदेश यातून देण्यात आला होता. आपला शेतकरी संकटात आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची सरकारने सर्व शेतकऱ्यांना  सरसकट कर्जमाफी मिळावी. ओला दुष्काळ जाहीर व्हावा. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे बरेच नुकसान झाले आहे. सर्व शेतकऱ्यांना सुगीचे दिवस यावे. या उद्देशाने शेतकऱ्यांच्या हस्ते मसाला दूध वाटप करण्यात आले.  
छ.संभाजी राजे युवा प्रतिष्ठान, जगदंब ग्रुप अध्यक्ष गणेश रावळ, अशोक पाटील,  शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक यु.टी. जाधव, सतीश पाटील,विकी दौंडे, सागर कारंडे, चंद्रकांत ऐवळे,, श्याम ऐवळे, व सुरज अपार्टमेंट सदस्य उपस्थित होते. मसाले दूध वाटप कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता सुरू झाला व रात्री 9 पर्यंत सुरू होता. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मसाले दूध घेण्याकरिता स्टॉलवर गर्दी केली होती. यात्रेच्या मुख्य प्रवेशद्वार स्वागत कमानी उभाकरून सामाजिक संदेश देण्यात आला. दारू नको, दूध प्या. हा अनमोल सामाजिक संदेश यातून देण्यात आला.
यात्रेला येणाऱ्या सर्व नागरिकांनी दुधाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाला आटपाडी तालुक्याचे युवा नेते संभाजीशेठ पाटील स्वतः हजर न राहता त्यांनी दिलेल्या योगदानाची सर्व नागरिकाकडून भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती संभाजी राजे युवा प्रतिष्ठान, जगदंब ग्रुप व सुरज अपार्टमेंट सदस्य यांनी केले होते. यशवंत मोरे, नित्यानंद पाटील, सचिन सपाटे, अभिजीत बालटे, सोमनाथ माळी, राहुल केंगार, मल्हारी जाधव, प्रवीण लोहार, शुभम तारळेकर यांनी नेटके संयोजन केले. संभाजीशेठ पाटील यांनी सर्वांनी कार्यक्रमासाठी दिलेल्या योगदानाचे व यात्रेत येणाऱ्या सर्व नागरिकांचे  आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment

Advertise