आटपाडी फळ बाजार पेठेत किवी फळाला मागणी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 25, 2019

आटपाडी फळ बाजार पेठेत किवी फळाला मागणी.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/बिपीन देशपांडे : आटपाडी शहरासह परिसरात डेंग्यू, मलेरिया आजारासह साथीचे आजार पसरले असून डेंग्यूमुळे शाळकरी विद्यार्थ्यांनीचा मृत्यू झाला काहीजणावर उपचार चालू आहेत. परिणामी डेंग्यूमुळे कमी होणाऱ्या पांढऱ्या पेशी नियंत्रण ठेवण्यात केवी फळ, पपई, ड्रॅगन फ्रुट उपयोगी येते. त्यामुळे बाजारपेठेत या फळाला मागणी वाढली असून तीन फळे एकशे दहा रुपयांना विक्री केली जात आहे. आटपाडी शहरासह परिसरात डेंग्यू आजाराचे लागण आहे. 
ठिकठिकाणी खाजगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी दिसून येते आहे. डेंग्यूमुळे कमी होणाऱ्या पेशी या केवी नावाचे फळ खाल्ल्याने पेशी वाढतात आणि नियंत्रित राहतात. येथील बाजारपेठेतील फळविक्रेते उत्तम तळेकर, गणेश रावळ, बाळू सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, बाजारपेठेत किवी फळाचे ड्रॅगन फूट, पपई याची मागणी वाढली असून एका बॉक्समध्ये  तीन फळे असतात.  सरासरी दिवसभरात  शंभर ते दीडशे बॉक्सची विक्री होत आहे.  ड्रॅगन फूड, कच्ची पपई खाल्ल्यामुळे पेशीची संख्या  वाढून  रोगप्रतिकारक शक्ती वाढते.  त्यामुळे फळ विक्रेत्यांकडे  फळांची खरेदी करण्याकडे  अनेकांचा कल असून  फळ मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येते आहे.

No comments:

Post a Comment

Advertise