गणेश सागर यांचे निधन; आटपाडीतील प्रतिष्ठित व्यापारी होते ; डेंग्यूमुळे शहरातील दुसरा बळी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 25, 2019

गणेश सागर यांचे निधन; आटपाडीतील प्रतिष्ठित व्यापारी होते ; डेंग्यूमुळे शहरातील दुसरा बळी.


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडीच्या बाजार पटांगणातील सागर जनरल स्टोअर्स आटपाडीचे मालक गणेश विठोबा सागर वय 45 यांचा डेंग्यूच्या तापाने काल निधन झाले. आटपाडी बाजारपेठेतील एक प्रामाणिक, शांत, संयमी, खडतर प्रवास करताना कुणालाही न दुखावता आपुलकीची ओळख निर्माण केलेले व्यक्तीमत्त्व अशी त्यांची ओळख होती. गेले ४ दिवस मृत्यूशी झुंज देत होते. अखेर काल दि. २४ रोजी त्यांच्या निधन झाले. आटपाडीतील डेंग्यू आजाराचा नोव्हेंबर महिन्यातील हा दुसरा बळी गेला आहे. गोंदीरा वस्तीवरील शाळकरी मुलगी निकिता बाळासाहेब चव्हाण हिचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला होता. आटपाडी शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे. मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. ताप, थंडीचे, मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत. आटपाडीत युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. 
मनमिळावू असणार्यात गणेश सागर यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात आली. कमी वयात व्यवसायाची जबाबदारी पेलून सागर जनरल स्टोअर्स आटपाडी तालुक्यात त्यांनी नावलौकिक मिळवला होता. बाजार पटांगण चौकातील सार्वजनीक गणेश रिक्षा मंडळाचे ते सदस्य होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. मंगळवारी त्यांना तापाने आजारी असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल सांगलीत खाजगी रुग्णालयात त्यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. निधनाची बातमी कळताच व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली  वाहण्यात आली.

No comments:

Post a Comment

Advertise