Type Here to Get Search Results !

....तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पंतप्रधान झाले असते; भारत देश जगात शक्तीशाली देश म्हणून पुढे आला असता : सादिक खाटीक.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
 आटपाडी/दि.२२ प्रतिनिधी : नियती व देशाने डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना पहिली वीस वर्षे भारताचे पंतप्रधान होवू दिले असते तर भारत सारे जहाँत अव्वल सर्वशक्तीशाली देश म्हणून पुढे आला असता असे उदगार राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी काढले. 
 फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचच्या वतीने  संविधान सप्ताह च्या निमित्ताने आयोजित व्याख्यानाच्या अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते.  गोमेवाडी गावचे सुपुत्र, जतचे दिवंगत माजी आमदार जयंत सोहनी यांचे स्मरण करून सादिक खाटीक यांनी संयोजक राजेंद्र खरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रतिकुल आर्थिक परिस्थिती असताना ही गेली पाच वर्षे संविधान सप्ताहाचा सुरु ठेवलेला हा उपक्रम भविष्यात राज्य आणि देशात इतिहास निर्माण करणारा ठरणार आहे, या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी सर्वांनी मदतीचा हात दिला पाहीजे असे स्पष्ट केले.
सादिक खाटीक पुढे म्हणाले,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौफेर कार्याचे आणि संविधानाचे, गावोगावी पारायण झाले पाहीजे. बहुजनाना डॉ. आंबेडकर आणि संविधान समजल्यास संविधानाविरूध्द कोणाची ब्र ही काढण्याची हिम्मत होणार नाही. आंबेडकर  आणि संविधान अभ्यासक समाज मोठया ताकदीने उभारण्यासाठी शालेय शिक्षणापासून पदवी पर्यतच्या अभ्यासक्रमात संविधान आणि आंबेडकरांच्या विचारप्रणालीचा समावेश व्हावा म्हणून शासन पातळीवर आपण आवाज उठविणार आहोत असे शेवटी ते म्हणाले.
प्रारंभी स्वागत व प्रास्तावीक मंचाचे अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केले. सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या व भोजनदान प्राथमिक शिक्षिका सौ.राजश्री मोटे यांचा संविधानाची प्रत भेट देवून गौरव करण्यात आला. यावेळी विचारमंचचे उपाध्यक्ष लक्ष्मण मोटे (साहेब), रणजीत ऐवळे, धीरज प्रक्षाळे,  सचिव सुरेश मोटे सर , प्रा. बालाजी वाघमोडे, एस.एन. पाटील, प्रा.संताजी देशमुख, अरविंद चांडवले, दीपक खरात, महेश काटे, सौ. सुश्मिता  मोटे, सौ. अनिशा रविकिरण जावीर, सौ. कविता खरात, सौ. माया वाघमोडे,  सौ. पुनम ऐवळे, श्रीमती प्रमिला प्रक्षाळे, वैशाली मोटे, छाया मोटे, सुजाता मोटे, अनिता मोटे, रोहीणी कदम, वैशाली कदम, लक्ष्मी कदम इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षकांचे नेते शाम ऐवळे सर यांनी केले तर आभार बिपीन देशपांडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies