संविधानाचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे : प्रा.डॉ. पाटील. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 29, 2019

संविधानाचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे : प्रा.डॉ. पाटील.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
तासगाव/प्रतिनिधी : येथील संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. बी.एम.पाटील म्हणाले, भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे. प्रत्येक नागरिकांनी राज्यघटनेतील कायद्यांचे पालन केल्यास लोकशाही सुदृढ होईल व सर्वांचा विकास होईल. 
पुनम पोरे, पूजा शिंदे व धनश्री पाटील या प्रशिक्षणार्थींनी भारतीय संविधानावर आधारित भित्तीपत्रिका तयार केली. सायली पाटील, अश्विनी, रूपाली माळी, जाकीर शेख यांनी भारतीय संविधानावर आधारित मनोगते व्यक्त केली. कु. जाकीर शेख यांनी सहा भाषेत लिहिलेल्या प्रतिज्ञा पुस्तिकेचे प्रकाशन प्राचार्याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा.सौ.एल.व्ही. भंडारे व ए.एस. चिखलीकर यांनी भारतीय संविधान व स्त्रीविषयक कायदे यावर आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक साधना शिंदे यांनी केले तर आभार कु.अश्विनी खोत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.एम.एस.उबाळे, प्रा.डॉ.ए.टी.पाटील, प्रा.सौ.पी.एस.घोरपडे, एस.एस. महाडीक, एस.आर. कुंभार, एस.जी.कोठावळे व एच.डी. वाघमारे यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षणार्थीं साधना शिंदे व श्रद्धा धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले.

No comments:

Post a Comment

Advertise