Type Here to Get Search Results !

उद्धव ठाकरे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
मुंबई : महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी राज्यात सत्ता स्थापन करणार असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी कडून जयंत पाटील, छगन भुजबळ व काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. 
महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून त्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. हजारो लोकांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक मनु सिंघवी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, टी. आर. बालू, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, आई-वडिलांचं स्मरण करून आणि संविधानला स्मरून त्यांनी शपथ घेताच शिवतीर्थावर एकच जल्लोष करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्राला विधानसभेच्या निकालाच्या ३६ दिवसानंतर महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभला असून राज्यातील सत्तापेचालाही पूर्णविराम मिळाला आहे. उद्धव ठाकरे शपथविधीनंतर जनतेसमोर नतमस्तक झाले. उद्धव यांच्यानंतर शिवसेनेकडून शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे हस्तांदोलन करत अभिनंदन केलं. शपथविधी सोहळा आटोपल्यानंतरही उद्धव ठाकरे जनसागरासमोर नतमस्तक झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies