मी जयंतराव पाटील शपथ घेतो की.. अन आटपाडीत साजरा झाला जल्लोष. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 29, 2019

मी जयंतराव पाटील शपथ घेतो की.. अन आटपाडीत साजरा झाला जल्लोष.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : राज्याच्या मंत्रीमंडळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या समावेशाबद्दल आटपाडीत फटाक्यांच्या आतषबाजी आणि घोषणांच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीचे सांगली जिल्ह्याचे नेते रावसाहेबकाका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अ कार्यकर्त्यानी यावेळी हजेरी लावून आनंद द्विगुणीत केला. 
यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रथमतः महात्मा फुले, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक, युवा नेते सुरज पाटील, आटपाडी शहर अध्यक्ष संभाजीराव पाटील, तालुका युवक अध्यक्ष अमित ऐवळे, उपाध्यक्ष किशोर गायकवाड, गोरखनाना पाटील, जितेंद्र चव्हाण, मोहन पाटील, मधुकर बाड, हणमंत कदम, कुंडलीक विभूते, शिवाजी कदम, दत्ता जाधव, हणमंतराव चव्हाण  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise