क्रेडिट कार्डला बोनस मिळाल्याच्या बहाण्याने ३१ हजारांची फसवणूक. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, November 24, 2019

क्रेडिट कार्डला बोनस मिळाल्याच्या बहाण्याने ३१ हजारांची फसवणूक.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
सोलापूर : आपल्या क्रेडिट कार्डला बोनस मिळाला असल्याचे सांगून विश्वासाने मोबाईल वरील ओटीपी क्रमांक मागून ३१ हजार रुपयापेक्षा अधिक रक्कमेची चोरी करण्यात आली. हा प्रकार ७ नोव्हेंबर रोजी दुपारी घडला. ९५६८९६६१७९ क्रमांकाच्या भ्रमणध्वनीवरून कॉल केलेल्या व्यक्तीने दिगंबर चंद्रय्या चिंताकिंदी यांच्याकडून ओटीपी मागून घेऊन त्यांच्या खात्यावरील 31 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम परस्पर काढून फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध जेल रोड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोगल या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.


No comments:

Post a Comment

Advertise