फोन लावण्याचा बहाणा करून चोरट्याने चोरले दोन कर्मचाऱ्यांचे मोबाईल. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, November 24, 2019

फोन लावण्याचा बहाणा करून चोरट्याने चोरले दोन कर्मचाऱ्यांचे मोबाईल.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सोलापूर/प्रतिनिधी : फोन लावायचे आहे असे सांगून पुण्याच्या ग्राहकाने हॉटेल मधील दोन कर्मचाऱ्यांचे मोबाईल चोरल्याची घटना फौजदार चावडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडली आहे. याबाबत कुणाल अंबादास बडेकर (वय २६, रा.राजीव गांधी नगर,भवानी पेठ) याने फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी बडेकर हा वैष्णवी हॉटेल हॉटेलमध्ये वेटरचे काम करत आहे. आरोपी विकास संजय हगवणे (रा.भुकुम,पिरगुंट,जि.पुणे) हा रविवार १० नोव्हेंबर पासून वैष्णवी हॉटेल,येथे राहण्यास आला होता. यामुळे हगवणे याच्याशी फिर्यादीची चांगली ओळख झाली. रविवार १७ रोजी सायंकाळी मला फोन लावायचे आहे असे सांगून त्याने बडेकर याच्या कडून मोबाईल घेतले. दरम्यान बडेकर हा दुसऱ्या ग्राहकाच्या सेवेसाठी गेला आणि थोड्या वेळेने आल्यानंतर त्याच्या रुमला लॉक दिसले. यामुळे स्वागतकक्षामध्ये विचारणा केले असता हगवणे याने रुम खाली केल्याचे त्याला कळाले. याच दरम्यान हॉटेलमधील दुसरा कर्मचारी हा मोबाईल घेऊन गेल्याची माहिती बडेकर याला कळाली. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने बडेकर याने आरोपी विकास हगवणे याच्या विरोधात दोन मोबाईल घेऊन गेल्याची फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून हगवणे याच्यावर फौजदार चावडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चौधरी हे करत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise