सुवर्णकाराची १२ लाखाची फसवणूक. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, November 24, 2019

सुवर्णकाराची १२ लाखाची फसवणूक.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सोलापूर/प्रतिनिधी : सोन्याचे दागिने जोडण्याची मशीनचा १३ लाख ७० हजार रुपयांना सौदा ठरल्यानंतर ती रक्कम घेऊन मशीन पोहोच न करता सुवर्णकाराची बारा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ०१ मार्च २०१९ पासून काल दरम्यान घडला. या प्रकरणी महेश नागनाथ धाराशिवकर यांनी फिर्याद दाखल केल्याने फौजदार चावडी पोलिसांनी उदय सिताराम शिरसागर (रा. चांदणी चौक, पुणे) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात आले. 
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दक्षिण कसबा, लक्ष्मी मार्केट येथील रहिवासी महेश धाराशिवकर यांना सोन्याचे दागिने जोडण्याची सेस्मा कंपनीची लेझर मशीनची गरज होती. त्यातूनच धाराशिवकर यांनी पुणे येथील उदय शिरसागर यांच्या कार्यालयात जाऊन त्या मशीन संबंधित बोलणी करून १३ लाख ७० हजार रुपये त्याची किंमत ठरविली होती. त्या मशीनच्या किमती पोटी धाराशिवकर यांनी २३ एप्रिल रोजी २ लाख रुपयांची रक्कम ॲडव्हान्स म्हणून पाठवली. त्यानंतर दोन मे रोजी दीड लाख रुपये पाठवून दिले. याच पद्धतीने १० लाख ६० हजार रुपयांची रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात घेऊन आरटीजीएस पद्धतीने शिरसागर यांच्या खात्यावर पाठवली. ठरल्याप्रमाणे रक्कम पाठवून दिल्यानंतरही क्षीरसागर यांनी मशीन देण्याऐवजी टाळाटाळ सुरू केली. शेवटी मशीन मिळत नसल्याचे पाहून धाराशिवकर यांनी पैशाची मागणी केली असता, केवळ २ लाख रुपये देऊन उर्वरित रकमेची फसवणूक केली. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक माने या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहे.

No comments:

Post a Comment

Advertise