दुचाकी वाहनांसाठी पसंती क्रमांक पाहिजे ! तर विहित नमुन्यात अर्ज व शुल्क जमा करा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 29, 2019

दुचाकी वाहनांसाठी पसंती क्रमांक पाहिजे ! तर विहित नमुन्यात अर्ज व शुल्क जमा करा.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली या कार्यालयात लवकरच खाजगी दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथे मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालय व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो. नागरिकांनी पसंतीनुसार आकर्षक नोंदणी क्रमांक सुलभतेने मिळावा याकरिता उपलब्ध वाहन धारकांनी नव्याने सुरू होणाऱ्या दुचाकी वाहनांसाठीच्या मालिकेतील आकर्षक तसेच पसंती क्रमांक आरक्षित करण्यासाठी दि. 29 नोव्हेबर 2019 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते 2 या वेळेत खिडकी क्रमांक 15 येथे विहित नमुन्यात अर्ज व शुल्क जमा करावे.
वरील अर्ज कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभाग डिमांड ड्राफ्ट पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅन कार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा. शुल्काचा डी.डी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या नावे नॅशनल बँकेचा असावा. अर्जदारास पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील.
 अर्जासोबत केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटर वाहन नियम 1989 च्या नियम 5 अ मध्ये विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ लाईटबील, टेलीफोन बील, इत्यादी,
अर्जदाराची ओळख पटवण्यासाठी अर्जासोबत अर्जदाराने त्याचे फोटो ओळखपत्र उदाहरणार्थ आधारकार्ड/ निवडणूक आयोगाचे ओळखपत्र/ पासपोर्ट/ पॅन कार्ड/ इत्यादी, ची साक्षांकित प्रत सादर करावी. एकाच नंबर करिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात येईल. सदरच्या लिलावाकरिता अर्जदारांनी दुसऱ्या दिवशी पूर्वी जमा केलेल्या डी.डी शिवाय ऐच्छिक जास्त रकमेचा एकच डी.डी बंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी संबंधित अर्जदाराच्या समोर लिफाफे उघडून ज्या अर्जदारांनी विनिर्दिष्ट  शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल तर त्यास पसंती क्रमांक वितरित केला जाईल.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल .व जमा शुल्क सरकार जमा होईल. विशिष्ट नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी जमा करण्यात आलेला शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत अथवा समायोजन करता येणार नाही.

No comments:

Post a Comment

Advertise