पाणी परवाने व विद्युत उपसा यंत्र परवाने31 डिसेंबर अखेर नुतनिकरण करुन घ्यावेत. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 29, 2019

पाणी परवाने व विद्युत उपसा यंत्र परवाने31 डिसेंबर अखेर नुतनिकरण करुन घ्यावेत.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : सांगली पाटबंधारे मंडळ या विभागांतर्गत 31 मे 2016 या दिनांक पूर्वी पाणी परवाना व विद्युत यंत्र परवाना मंजुरी घेणाऱ्या सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यातील व सातारा जिल्ह्यातील कराड , कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील सर्व लाभधारक बागायतदार सहकारी पाणीपुरवठा संस्था यांनी ज्या बागायतदारांची ग्राहकांची पाणी परवाने व विद्युत उपसा यंत्र परवाने मे 2019 अखेर कार्यान्वित झालेले नाहीत असे पाणी परवाने व विद्युत उपसा यंत्र परवाने शासन निर्णयातील तरतुदीनुसार रद्द करण्यात येणार आहेत. ज्या लाभधारकांची सहकारी संस्थांची परवान्याची मुदत संपलेली आहे अशा लाभधारकांनी सहकारी संस्थांनी आपले पाणी परवाने व विद्युत उपसा यंत्र परवाने दिनांक 31 डिसेंबर 2019 अखेर नुतनिकरण करुन घ्यावेत, अन्यथा असे पाणी परवाने, विद्युत उपसा यंत्र परवाने आपणास आवश्यकता नाही असे समजुन परवाने आपओप रद्द होतील अशी सूचना कार्यकारी अभियंता नामदेव  करे यांनी केली आहे. 
तसेच ज्या सहकारी पाणीपुरवठा संस्था यांनी दिनांक 1 जुलै 2017 ते 30 जुलै 2023 या कालावधीचा पाणी परवाना पुनर्विलोकन करुन क्षेत्र निश्चितीसह करारनामा करून घेतले नाहीत त्या सहकारी संस्थांनी त्वरित आपल्या संस्थेची क्षेत्र निश्चित करून करारनामे करून घ्यावेत. अन्यथा ज्या संस्थांनी दिनांक 1 जुलै 2017 ते 30 जुलै 2023 या कालावधीत ज्या लाभधारक सभासदांचे नमुना 7 भरून दिले आहेत त्या गट क्रमांकाचे क्षेत्र निश्चित केले जाईल व सबंधिताना उर्वरित क्षेत्राची आवश्यकता नाही असे समजून उर्वरित क्षेत्राचा परवाना रद्द करण्यात येईल. असेही त्यांनी कळविले आहे. याबाबत हरकत असल्यास दिनांक 31 डिसेंबर 2019 पर्यंत कार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारे विभाग सांगली यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात यावे.

No comments:

Post a Comment

Advertise