Type Here to Get Search Results !

कचराकुंडी असूनही रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांची संख्येत वाढ; ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई करणे गरजेचे.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/बिपीन देशपांडे : स्वच्छ आणि सुंदर आटपाडी शहर स्वच्छतेसाठी आटपाडी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न केले जात आहे. ग्रामपंचायतीकडून प्रत्येक वार्डामध्ये व मुख्य पेठेतून रोज कचरा एकत्रित करण्यासाठी नियमितपणे टॅक्टर व्यवस्था करण्यात आली असून ट्रॅक्टर फिरून कचरा टाकण्याचे आवाहन ग्रामपंचायत कर्मचारी करीत आहेत. 
डासांचा वाढता प्रादुर्भाव, डेंग्यू रुग्णांची संख्या यामुळे आटपाडी ग्रामपंचायतीकडून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून तुंबलेल्या गटारी काढल्या जात आहेत. शहरातील अंगणवाडी जवळील वाढलेली काटेरी झुडपे जेसीबीने काढली जात असून अन्य उपायोजना यासह स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र शहरातील बेजबाबदार नागरिकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असून शहरांमध्ये ठिक-ठिकाणी कचराकुंड्या असूनही रस्त्यात कोणी नसलेले पाहून सुशिक्षित नागरिक कुंड्या रिकाम्या असूनही कुंडीत कचरा न टाकता रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढीग उभारत आहेत. यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या जास्त झाली असून या कचऱ्यात खायला मिळत असल्याने टाकाऊ पदार्थ, शिळे अन्न शोधताना इतरही कचरा त्यांच्याकडून विस्कटला जत असून त्यामुळे वातावरण दूषित होत असल्याने साथीचा आजार पसरण्याचा धोका आहे. खादी भंडार, बस स्थानक, सांगोला चौक, शेटफळे रोड, पेठ, बाजारपेठ याभागात कुत्र्यांचा सुळसुळाट आहे, गटागटाने फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या भांडणात वाहनधारकांना याचा त्रास होत आहे. केवळ रस्त्यावर बेजबाबदार कचरा टाकणाऱ्या नागरिकांना कोणाची भीती नाही. शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून विशिष्ट कचरा टाकणाऱ्या नागरिकांना दंडात्मक कारवाई गरजेची बनली आहे. प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे याची जाणीव झाली पाहिजे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies