संविधान दिन विविध उपक्रमांनी मंगळवारी साजरा करण्यात येणार. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, November 23, 2019

संविधान दिन विविध उपक्रमांनी मंगळवारी साजरा करण्यात येणार.

                                                              माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत दि. 26 नोव्हेंबर 2019 रोजी “संविधान दिन” साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत मंगळवार दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता सांगली शहरामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, एसटी स्टँडजवळ भारतीय संविधानाच्या उददेशिकेचे समुह वाचन करण्यात येणार आहे. तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते स्टेशन चौक,सांगली या मार्गावर संविधान  प्रभातफेरी काढण्यात येणार आहे.
 तरी, सांगली जिल्हयातील सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्व नागरिकांना वेळेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, एसटी स्टँडजवळ, सांगली येथे उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सांगली अर्जुन बन्ने यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise