Type Here to Get Search Results !

दुकाने व आस्थापना अधिनियमानुसार आस्थापनेचा नामफलक मराठी देवनागरी लिपित असणे आवश्यक.


                                                                                 माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली :  महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरी व सेवार्थीचे विनियमन) अधिनियम 2017 या अधिनियमाच्या तरतुदी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू आहेत. अधिनियमातील कलम 35 नुसार प्रत्येक आस्थापनेचा नाम फलक हा मराठी देवनागरी लिपित असावा आणि तो प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे. परंतु मालक आस्थापनेचा नाम फलक हा मराठी देवनागरी लिपिबरोबरच आणखी इतर भाषेत लिहू शकते. तथापी मराठी भाषेतील नाम फलक कार्यशील अक्षराचा आकार इतर भाषेतील आकारापेक्षा लहान असू नये. मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा देणाऱ्या आस्थापनेस महापुरूषाची किंवा गडकिल्याची नावे देण्यात येऊ नयेत. या तरतुदीचा भंग करणाऱ्या आस्थापना मालकावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांनी सूचना दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies