वसतिगृहामध्ये रिक्त जागासाठी प्रवेश अर्जाचे वाटप व स्वीकृती 5 डिसेंबर पर्यंत. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, November 23, 2019

वसतिगृहामध्ये रिक्त जागासाठी प्रवेश अर्जाचे वाटप व स्वीकृती 5 डिसेंबर पर्यंत.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : सांगली जिल्ह्यातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मुले-मुलींसाठी शासनाच्या वतीने सुसज्ज वसतिगृह उभारण्यात येणार आहेत. सांगलीतील मुलांच्या वसतिगृहामध्ये 8 जागा व मुलींच्या वसतिगृहासाठी 15 जागा मराठा विद्यार्थ्यांच्या रिक्त आहेत. या जागांवर गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे. दिनांक 5 डिसेंबर 2019 अखेर या योजनेस पात्र विद्यार्थी, विद्यार्थीनीना विहित नमुन्यातील अर्जाचे वाटप व स्वीकृती सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सांगली जुना बुधगाव रोड, सांगली येथे विनामुल्य होईल. अधिक माहितीसाठी 0233-2374739 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.  
या योजनेअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता केंद्रीभूत (CET)  प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना फक्त निवासाची मोफत सोय करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यास अन्य कोणत्याही सोयी पुरविण्यात येणार नाहीत. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असवा, पालकांचे वार्षिंक उत्पन्न 8 लाख मर्यादेपेक्षा कमी असावे. विद्यार्थी सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका हद्दीतील तसेच हद्दीबाहेरील 5 किमी परिसरातील महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येईल. तसेच महानगरपालिका परिक्षेत्रापासून 20 कि.मी. अंतरापेक्षा जास्त अंतर असलेलेच विद्यार्थी या योजनेचा लाभ घेवू शकतील.


No comments:

Post a Comment

Advertise