उत्तरेश्वर यात्रेनिमित्त विविध कर्यक्रम. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, November 20, 2019

उत्तरेश्वर यात्रेनिमित्त विविध कर्यक्रम.माणदेश एक्सप्रेस न्युज 
 आटपाडी/ प्रतिनिधी: आटपाडीत उत्तरेश्वर देवस्थानाची यात्रा भरली असून बाजार पटांगणातील शुक्र ओढा परिसरातील विविध प्रकारचे स्टॉल, खेळणी, पाळणे आले आहेत. गेली तीन दिवस यात्रेनिमित्त आटपाडी महोत्सवाचे आयोजन निमित्त सायकल स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, शालेय विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम, मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाल्या त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. रेडिओ मिरची कोल्हापूर फेम आकाश पाटील यांचा  महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम झाला त्यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.  या स्पर्धेतील विजेता महिलेस पैठणी भेट दिली गेली. बुधवार दिनांक 20 रोजी सायंकाळी 7:00 वाजता बहारदार लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. बी.बी प्रस्तुत त्रिमूर्ती प्रोडक्शनचा लावणी ची “धमाल भावना ची कमाल” हा कार्यक्रम सिनेकलाकार मिस भावना सोबत मुंबईच्या नृत्यांगना कार्यक्रम सादर करणार आहेत. बुधवार ता 20 रोजी खिलार जनावरांचे प्रदर्शन निवड व बक्षीस समारंभ होणार आहे. गुरुवार ता 21 रोजी उत्तरेश्वर देवस्थानच्या मंदिरात सकाळी दहा वाजता नैवद्य व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत तर दुपारी चार वाजता नवीन सागवानी रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. 
तरी भाविक भक्तांनी उत्तरेश्वर यात्रेला भेट देवून यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा. 

No comments:

Post a Comment

Advertise