Type Here to Get Search Results !

सावळज व कोकरूड विभागाची पोट निवडणूक जाहीर; मतदान 12 डिसेंबर तर मतमोजणी 13 डिसेंबर रोजी.




माणदेश एक्सप्रेस न्युज  
सांगली : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील 22-सावळज व शिराळा येथील 48-कोकरूड या विभागाची (गटांची) रिक्त पदाकरिता पोट निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी मतदान दिनांक 12 डिसेंबर 2019 तर मतमोजणी दिनांक 13 डिसेंबर 2019 रोजी होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
निवडणूक विभाग / निर्वाचक गणाच्या पोट निवडणूकीची आचार संहिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहणार आहे. आचार संहिता निवडणूक होणाऱ्या संबंधित निवडणूक विभाग / निर्वाचक गणाच्या क्षेत्रात लागू राहील, असे निवडणूक कार्यक्रमामध्ये नमुद करण्यात आले आहे. आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे नियोजन करून कार्यवाही करण्यात यावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या आहेत.
पोट निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. निवडणुकीच्या तारखांची सूचना व निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिध्द करण्याची तारीख - शुक्रवार दि. 22 नोव्हेंबर 2019. संकेतस्थळावर भरण्यात आलेले नामनिर्देशनपत्र निर्वाचन अधिकाऱ्यांनी स्विकारण्याचा कालावधी - शुक्रवार दि. 22 नोव्हेंबर 2019 ते (सकाळी 11 ते दु. 3 पर्यंत) बुधवार दि. 27 नोव्हेंबर 2019 पर्यंत (सकाळी 11 ते दु. 3 पर्यंत) (रविवार दि. 24 नोव्हेंबर 2019 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत). नामनिर्देशनपत्राची छाननी व त्यावर निर्णय देणे - गुरूवार दि. 28 नोव्हेंबर 2019 (सकाळी 11 वाजल्यापासून). वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक - गुरूवार दि. 28 नोव्हेंबर 2019 (छाननीनंतर लगेचच). नामनिर्देशनपत्राचा स्विकार करण्याबाबत किंवा ते नामंजूर करण्याबाबतचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरूध्द जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल करण्याची शेवटची तारीख - सोमवार दि. 2 डिसेंबर 2019. जिल्हा न्यायाधिशांनी अपिलावर सुनावणी व निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख - गुरूवार दि. 5 डिसेंबर 2019. जिल्हा न्यायाधिशांनी अपिल निकालात काढल्यावर वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे - गुरूवार दि. 5 डिसेंबर 2019. उमेदवारी मागे घेणे - जेथे अपील नाही तेथे - बुधवार दि. 4 डिसेंबर 2019 (सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत) व जेथे अपील आहे तेथे - शनिवार दि. 7 डिसेंबर 2019 (सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत). निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे व निशाणी वाटप - जेथे अपील नाही तेथे - बुधवार दि. 4 डिसेंबर 2019 (दुपारी 3.30 नंतर) व जेथे अपिल आहे तेथे - शनिवार दि. 7 डिसेंबर 2019 (दुपारी 3.30 नंतर). मतदानाची तारीख - गुरूवार दि. 12 डिसेंबर 2019 (सकाळी 7.30 ते 5.30 पर्यंत). मतमोजणी तारीख - शुक्रवार दि. 13 डिसेंबर 2019 (सकाळी 10.00 पासून). निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिध्द करणे - मंगळवार, दि. 17 डिसेंबर 2019 पर्यंत.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies