Type Here to Get Search Results !

जिल्ह्याच्या भूजल पातळीत सरासरी 58 सें.मी. ने वाढ.



माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली :  सांगली जिल्ह्यातील स्थिर भूजल पातळीच्या नोंदी घेण्यासाठी 86 निरीक्षण विहिरी निश्चित केलेल्या आहेत. ऑक्टोबर 2019 मधील निरीक्षण विहिरीतील पाणी पातळीचा मागील पाच वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील सरासरी भूजल पातळीशी तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये मागील पाच वर्षाची सरासरी भूजल पातळी 4.27 मी. होती. माहे ऑक्टोबर 2019 मध्ये  त्यामध्ये 58 सें.मी. ची वाढ होवून स्थिर भूजल पातळी 3.70 मी. झाली आहे.  यात जिल्ह्यातील एकूण 86 निरीक्षण विहिरींपैकी 52 विहिरीमधील भूजल पातळीमध्ये सरासरीपेक्षा वाढ झालेली असून 34 निरीक्षण विहिरींमधील भूजल पातळीमध्ये सरासरीच्या तुलनेत घट आढळून आलेली आहे.   
ऑक्टोबर 2019 अखेर प्रत्यक्षात झालेल्या तालुकानिहाय पर्जन्यमानाचा ऑक्टोबर अखेरीस तालुकानिहाय सरासरी पर्जन्यमानासोबत तुलात्मक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार सरासरीच्या तुलनेत सर्वच 10 तालुकयात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्याचे आढळून येते. पर्जन्यमान व निरीक्षण विहीरीतील स्थिर भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास केला असता अवर्षण प्रवण व शाश्वत पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्ये सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत चालू वर्षात वाढ दिसून येते. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील 2019-20 या कालावधीकरीता संभाव्य पाणी टंचाई असलेल्या गावांची संख्या निरंक आहे. अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सांगली यांच्यातर्फे देण्यात आली.
तालुकानिहाय मागील 5 वर्षांची सरासरी भूजल पातळी व कंसात ऑक्टोबर 2019 ची स्थिर भूजल पातळी अनुक्रमे मीटरमध्ये पुढीलप्रमाणे.  खानापूर - 5.19 मी. (3.30 मी.) यामध्ये 1.89 मी. भूजल पातळीत वाढ झाली आहे. कडेगाव - 4.95 मी. (4.40 मी.) यामध्ये 55 सें.मी. भूजल पातळीत वाढ झाली आहे. तासगाव - 6.74 मी. (5.97 मी.) यामध्ये 77 सेंमी. भूजल पातळीत वाढ झाली आहे. पलूस - 3.69 मी. (2.10 मी.) यामध्ये 1.59 मी. भूजल पातळीत वाढ झाली आहे. शिराळा - 1.52 मी. (0.67 मी.) यामध्ये 85 सें.मी. भूजल पातळीत वाढ झाली आहे. कवठेमहांकाळ - 4.95 मी. (4.99 मी.) यामध्ये 4 सें.मी. भूजल पातळीत घट झाली आहे, जत - 5.43 मी. (6.44 मी.) यामध्ये 1 मी. भूजल पातळीत घट झाली आहे, मिरज - 3.08 मी. (2.22 मी.) यामध्ये 86 सें.मी. भूजल पातळीत वाढ झाली आहे, वाळवा - 2.05 मी. (2.03 मी.) यामध्ये 2 सें.मी. भूजल पातळीत वाढ झाली आहे, आटपाडी - 5.14 मी. (4.83 मी.) यामध्ये 31 सें.मी. भूजल पातळीत वाढ झाली आहे.
ऑक्टोबर ते मार्च या कालावधीमध्ये जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता वाटत नाही. तथापि स्थानिक परिस्थितीचा विचार करून टंचाई भासण्याची शक्यता असलेल्या तीन तालुक्यांचा समावेश एप्रिल 2020 ते जून 2020 कालावधीमध्ये करून त्यानुसार जिल्ह्याचा टंचाई अहवाल तयार करण्यात आल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांनी म्हटले आहे. स्थानिक परिस्थितीनुसार संभाव्य टंचाई भासणारी एकूण 73 गावे असून गावांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. कवठेमहांकाळ - 4, जत - 56 व आटपाडी - 13.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies