Type Here to Get Search Results !

लेंगरेवाडी येथे तीन ठिकाणी चोरी; ४८ हजार रुपयांचा ऐवज लंपास


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
आटपाडी : लेंगरेवाडी येथे तीन ठिकाणी चोरट्यांनी घर व दुकान फोडून ४८ हजार  रुपयांचा ऐवज लंपास केला. हि घटना दि. ५ रात्री १०.३०  ते ३.३०  च्या दरम्यान घडली.  याबाबत मायाप्पा महादेव  लेंगरे यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
महेश सुरेश  डिगोळे यांच्या दुकानातील 5 हजार रोख तर विठ्ठ्ल केरु लेंगरे  यांच्या दुध डेअरीतील 1 हजार चिल्लर, मायाप्पा  लेंगरे यांच्या घरातील कपाटात ठेवलेले  5 ग्रॅम वजनाचे सोन्याची ठुशी, पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे बदाम व रोख रक्कम २००००  चोरट्यांनी घरे फोडून लंपास केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies