जि.प.शाळा पालवेवस्ती (मोटेवाडी) शाळेसाठी लोकवर्गणीतून 15 हजार चा निधी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, October 6, 2019

जि.प.शाळा पालवेवस्ती (मोटेवाडी) शाळेसाठी लोकवर्गणीतून 15 हजार चा निधी


माणदेश एक्सप्रेस न्यूज
माळशिरस/संजय हुलगे : जि.प.शाळा पालवेवस्ती (मोटेवाडी) ता. माळशिरस, जि. सोलापुर शाळेसाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून 15 हजार चा निधी दिली आहे.या निधीतून सुमारे 300 फूट लांब पाईप करून नाना हांडे यांच्या बोअर मधून  शाळेला पाणी देण्यात आले. तसेच  तानाजी हांडे यांनी 1 हजार लिटर पाण्याची टाकी  शाळेतील मुला-मुलीना स्वच्छ पाणी मिळावे या उद्देशाने  पाण्याची टाकी भेट दिली. 
मोटेवाडी गावचे सरपंच  रावसो खरात यांनी पल्बिंग साहित्य दिले. चारी काढण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उद्योजक वैजिनाथ पालवे मोद्जो दिला. तसेच पल्बिंग कामासाठी  तात्या माने यांनी सहकार्य केले. एकूण 15 हजार 500  रू मधून शाळेचा महत्वाचा व सर्वांनसाठी उपयोगी असणारा पाणीप्रश्न सोडविण्यात आला.
यावेळी नवनाथ पालवे,  विठ्ठल पालवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच  शाळेचे मुख्याध्यापक  गणेश उबाळे, शाळेतील शिक्षक  नवनाथ माने,  हनुमंत गायकवाड व तबस्सूम मुल्ला  यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Advertise