Type Here to Get Search Results !

पूर्वजन्माची पुण्याई असेल तरच शिक्षकीपेशात काम करायला मिळते : श्रीमंत अजितराव राजेमाने

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
म्हसवड/अहमद मुल्ला जर पूर्वजन्माची पुण्याई असेल तरच  शिक्षकीपेशात काम करायला मिळते असे प्रतिपादन म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत अजितराव राजेमाने यांनी केले. ते सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य अशोक शिंदे यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्यात बोलत होते. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कॊंन्सिलचे सदस्य श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, मा.नगराध्यक्ष नितिन दोशी, प्राचार्य मधुकर नाळे उपस्थित होते.
आपल्या भाषणात राजेमाने पुढे म्हणाले की, सध्या स्पर्धेच्या युगात शिक्षकांनी आपल्याला बदलून घेतले पाहिजे. इतर शाळांपेक्षा आपल्या शाळेत जर विद्यार्थ्यांना वेगळे काही मिळाले तरच विद्यार्थी संख्या वाढून शाळा  टिकणार आहेत.
यावेळी बोलताना नितिन दोशी म्हणाले की, शाळा चालवणे हे कोणा एकाचे काम नसून ते टीम वर्क आहे. त्यासाठी शाळेतील सर्व घटकांनी एक टीम म्हणून काम करावे. विद्यार्थ्यांना नवनवीन ज्ञान देण्यासाठी प्रयत्नशील रहावे. 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून बोलताना श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने म्हणाले की, शिक्षणक्षेत्रात नव्यानेच आलेल्यांनी जुन्या लोकमनाचा आदर्श घ्यावा. तसेच आपली शाळा इतर शाळांपेक्षा काहीतरी वेगळी आहे असे विद्यार्थ्यांच्या मध्ये आपल्या कामाने रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत. 
या कार्यक्रमात दत्तात्रय माने, माजी प्राचार्य रुपनवर, काकडे,उपप्राचार्य सुधीर अहिवळे, पर्यवेक्षक गावडे, प्राचार्य मधुकर नाळे यांनी तसेच काही विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी  श्री व सॊ.शिंदे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. अशोक शिंदे यांनी शाळेसाठी एल.ई.डी प्रोजेक्टर भेट म्हणून दिला.
कार्यक्रमासाठी  माजी नगरसेवक श्रीमंत बाळासाहेब राजेमाने, इंजि. बाळासाहेब माने, शांताराम माने, स्कूल कमिटीचे श्रीमंत शिवराज राजेमाने, संभाजी माने, विपुल दोशी यांचेसह अनेक नागरिक माजी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष देशमुख यांनी तर सुत्रसंचालन अजित काटकर व दिलीप माने यांनी केले. आभार अवघडेसर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies