माळशिरस विधानसभा मतदारसंघात २२ उमेदवारांपैकी १६ उमेदवारांचे अर्ज वैध : निवडणुकीमध्ये ६ उमेदवारांचे अर्ज बाद - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 5, 2019

माळशिरस विधानसभा मतदारसंघात २२ उमेदवारांपैकी १६ उमेदवारांचे अर्ज वैध : निवडणुकीमध्ये ६ उमेदवारांचे अर्ज बाद

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरस विधानसभा मतदार संघात काल दिवसाखेर अर्ज दाखल करण्याची मुदत होती. दाखल झालेल्या अर्जांपैकी १६  उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. तर ६ उमेदवारांचे अर्ज अ वैध ठरवण्यात आले. अर्ज भरण्याची प्रक्रिया आज अखेर पूर्ण झाली. यामध्ये उदय पोपट कांबळे (अपक्ष), उत्तम एकनाथ मोटे (अपक्ष), त्रिभुवन विनायक धाईंजे  (अपक्ष), श्रीकृष्ण ज्ञानदेव प्रक्षाळे (बसपा), मकरंद नागनाथ साठे (अपक्ष), उत्तमराव शिवदास जानकर (राष्ट्रवादी), मनीषा आप्पासाहेब कर्चे (मनसे), राजू यशवंत सोनवणे (वंबआ), अजय जालिंदर सकट (अपक्ष), अशोकराव सोपानराव तडवळकर (भारतीय प्रजा स्वराज्य पक्ष), राम विठ्ठल सातपुते (भाजप),  गोरख सायबु नवगिरे (अपक्ष), विलास दाजी धाईंजे (अपक्ष) बापूराव महादेव अहिवळे (अपक्ष), बाळासाहेब दादा सपताळे (अपक्ष), राम भारत जगदाळे (अपक्ष), राजश्री शंकरराव लोंढे (अपक्ष) या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून श्रीमती सुनंदा काटे, धनंजय साठे, विलास धाईंजे, डॉ विवेक गुजर, सुधीर पोळ, अशोक गायकवाड या उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शमा पवार यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Advertise