Type Here to Get Search Results !

आटपाडीच्या बीडीएस बँकेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न : बीडीएस परिवाराच्या वतीने चंद्रयान २ मोहिमेसाठी इस्रोला २.५० लाखाची मदत अमरसिंह (बापू) देशमुख यांनी केली जाहीर


माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : आज दि. ८ रोजी दि. बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लि आटपाडी ता. आटपाडी, जि. सांगली या बँकेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी बँकेचे संस्थापक चेअरमन व सांगली जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष अमरसिंह (बापू) देशमुख बीडीएस परिवाराच्या वतीने चंद्रयान २ मोहिमेसाठी इस्रोला २.५० लाखाची मदत केली. याला सभासदांनी एकमुखी पाठींबा देत स्वागत केले. यामध्ये श्रीमत बाबासाहेब देशमुख मिल्क प्रोड्युसर कंपनीच्या वतीने १ लाख, दि. बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेच्या वतीने १ लाख व आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ५० हजार अशी एकूण २.५० लाख रुपये अशी मदत देण्यात येणार आहे.
आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांच्या पाठीशी दि. बाबासाहेब देशमुख सहकारी बँक राहिली असून आटपाडी तालुक्याचा आर्थिक कणा म्हणून देखील बँकेकडे पहिले जाते. बँकेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आटपाडी येथील तांबडा मारुती देवालय ट्रस्ट या ठिकाणी संपन्न झाली. यावेळी बँकेचे सर्व संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच तालुक्यातील सर्व जनतेकडून व सभासदांच्या वतीने इस्रो चे केंद्रप्रमुख के.शिवण व त्यांची सर्व टीम यांचे अभिनंदन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies