रासप चा उद्या दि. ९ रोजी नातेपुते येथे शेतकरी मेळावा : मंत्री महादेव जानकर व शेळी-मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाळसाहेब दोडतले यांची प्रमुख उपस्थिती - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, September 8, 2019

रासप चा उद्या दि. ९ रोजी नातेपुते येथे शेतकरी मेळावा : मंत्री महादेव जानकर व शेळी-मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाळसाहेब दोडतले यांची प्रमुख उपस्थिती


माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव शेळी मेंढी महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) बाळासाहेब दोलतले यांच्या प्रमुख उपस्थित कवितके सभागृह नातेपुते ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे उद्या दि. सायं. ३.०० वा. शेतकरी तसेच कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीतील घटक पक्ष आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतमध्ये माळशिरस विधानसभा ही राष्ट्रीय समाज पक्षाला मिळणार आहे. म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचा होणारा मेळावा हा माळशिरस विधानसभा लढण्याचा निर्धार मेळावा म्हणावा लागेल. राष्ट्रीय समाज पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रयत क्रांती संघटना यांच्यासोबत महायुतीत असून माळशिरस विधानसभा हा मतदार संघ  राष्ट्रीय समाज पक्षासाठी मिळणार आहे अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली असून माळशिरस विधानसभा पूर्ण ताकदीनिशी निवडून आणून सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार बनवण्यासाठी उद्याचा हा मेळावा घेण्यात आला आहे. मेळाव्याचे आयोजन माळशिरस तालुका राष्ट्रीय समाज पक्ष करत असून मेळाव्याची जय्यत तयारी झाली आहे. मेळाव्यास तालुक्यातून शेतकरी बांधव, कार्यकर्ते, हितचिंतक, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती माळशिरस येथे  बैठकीत पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अॅड. संजय माने-पाटील यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Advertise