Type Here to Get Search Results !

अहिंसा पतसंस्थेचा म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक वाघमोडे यांचे हस्ते लाभांश वाटप


माणदेश एक्सप्रेस न्युज 
म्हसवड दि.८/अहमद मुल्ला : म्हसवड येथील नामांकित पतसंस्था अहिंसा नागरी पतसंस्थेचा यावर्षीचा लाभांश वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांना निमंत्रित करण्यात आले होते. तसेच जेष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
अहिंसा पतसंस्था ही दरवर्षी होणाऱ्या नफयातून सभासदांना लाभांश देत असते. यावर्षी सभासदांना ८ % लाभांश देणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे म्हणाले की, अहिंसा पतसंस्था हि यशाच्या सर्वोच्च पातळीवर पोहचली आहे. याचे सर्व श्रेय संस्थेचे कुटुंबप्रमुख नितिनभाई दोशी यांना जाते. नितिनभाईचा कर्ज देणे व त्याचा पाठपुरावा करणे या त्यांच्या स्वभावामुळे अनेकांशी वाईटपणा घेऊन कर्जाची वसुली ते १००% करतातच. 
अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व म्हसवडचे माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, जिथे कर्तव्य बजवायचे असते तिथे नेहमी वाईटपणा येत असतो, परंतु त्यामुळे कर्तव्य सोडता येत नाही. पतसंस्था स्थापने पासून आजपर्यंत केवळ कर्तव्य बजावत आलो, त्यामुळे अनेकांशी वाईटपणाही आला. परंतु पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहाराबरोबर सामाजिक बांधिलकीची जाणीव असल्याने समाजातील अनेक गरजूंना शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील अनेकांना वेळोवेळी मदतही केली.
पतसंस्था चालवायची म्हणजे लोकांची विश्वासाहर्ता जपली पाहिजे. त्यावेळी आपल्या पतसंस्थेत अनेक लोक स्वतःहून ठेवी ठेवत असतात. याचेच प्रतीक म्हणून पतसंस्था फेडरेशनचा यावर्षीचा दिपस्तंभ पुरस्कार आमच्या पतसंस्थेस मिळाला असे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक गणेश वाघमोडे म्हणाले, आतापर्यंत मी पुस्तकात वाचले होते की 'विना सहकार नही उद्धार' ते पुस्तकातच असते असे वाटलेले. परंतु इथं नितिनभाई दोशी यांच्या अहिंसा पतसंस्थेचा पारदर्शक कारभार पाहिला असता नक्कीच ते वाक्य खरे आहे याची प्रचिती आली. कर्ज घेताना चेअरमन साहेब त्यांना देव वाटतात परंतु ते फेडताना कर्ज वसुलीसाठी त्यांनी लावलेला लोकांना मानहानीकारक वाटतो. परंतु प्रसंगी ते लोकांचा वाईटपणा घेतात पण वसुली करतातच. आजच्या फसवेगिरीच्या जमान्यात एवढी प्रामाणिक व भरभराटीस आलेली पतसंस्था खूप दिवसातून ऐकिवात आली. लोकांचा विश्वास संपादन करून लोकहिताच्या कामासाठी नफ्यातील रक्कम खर्च करणारी संस्था ही एकमेव असे मी मानतो.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन अजित व्होरा, संचालक महावीर व्होरा, अभिराज गांधी, प्रितम शहा, बाळासाहेब सरतापे म्हसवड मधील महिला पुरुष व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वाडेकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies