Type Here to Get Search Results !

पिरळे सरपंच पदी विद्या दशरथ लवटे यांची निवड


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
नातेपुते/प्रमोद शिंदे : पिरळे ता. माळशिरस, जि. सोलापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विद्या दशरथ लवटे यांची निवड करण्यात आली. पूर्वीच्या सरपंच सौ सुवर्णा मोहन सूर्यवंशी यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. या निवडीच्या वेळी ग्रामपंचायत पिरळे मधील दहा सदस्य उपस्थित होते. त्यामध्ये सरपंच विद्या लवटे, उपसरपंच दशरथ महादेव जाधव, सुवर्णा मोहन सूर्यवंशी, लता भीमराव दडस, अहिल्या दत्तात्रय रुपनवर, विद्याराणी प्रल्हाद किंर्दक, वैशाली ज्ञानदेव शिंदे, गणेश रामदास साळवे, बापूराव श्रीमंत बुधावले, रंजना पांडुरंग खिलारे तसेच दहीगाव मंडलाधिकारी, ग्रामसेवक रमेश जमदाडे, कोतवाल विश्वास बनकर, कर्मचारी सुरेश खिलारे, माणिक खिलारे उपस्थित होते. 
निवडीनंतर फटाक्यांची आतिषबाजी व गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवाजीराव लवटे-पाटील, महादेव शिंदे, ज्ञानदेव शिंदे, भीमराव दडस, पांडुरंग साळवे, दशरथ लवटे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन सरपंच यांची गावातून बैलगाडी मधून मिरवणूक काढण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies