Type Here to Get Search Results !

माळशिरस तालुक्यातील जलसंधारणाच्या कामासाठी माऊली पाटील यांच्या प्रयत्नातून दोन कोटी आठ लाख रुपये मंजूर

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
नातेपुते/प्रमोद शिंदे : महाराष्ट्र जलसंधारण विभागा अंतर्गत नातेपुते, लोणंद, फडतरी या गावांसाठी माळशिरस पंचायत समितीचे सदस्य ज्ञानराज उर्फ माऊली पाटील यांच्या अथक प्रयत्नातून जलसंधारणाच्या कामासाठी २ कोटी ८ लाख ७२ हजार निधी मंजुर झाला असल्याची माहिती माऊली पाटील यांनी दिली. 
महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांना दि.१०/७/१८ रोजी पत्र देऊन त्यामध्ये नातेपुते, फोंडशिरस, शिव, लोणंद, सोनारवाडा, सामुदायिक विहिरीजवळ लक्ष्मण होळ यांच्या शेतालगत, फरतडी शिवाजी डोंगरे शेताजवळ ग्रेटेड सिमेंट बंधारे बंधण्याकरिता त्या परिसरातील अनेक दिवसाचा प्रलंबित असलेला प्रश्न त्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण असल्या कारणाने सदरचे बंधाऱ्याचे काम होणे गरजेचे असल्याने तत्कालीन जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्याकडे सततचा पाठपुरावा केल्याने त्यांनी जिल्हा अधिकारी सोलापूर यांना पत्र देऊन सदरची कामे मंजुर करण्याच्या सूचना केलेल्या होत्या. त्या सूचनेच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनीही या बंधाऱ्यासाठी विशेष लक्ष घालून सदरच्या कामासाठी मदत केलेली होती. सदरचा प्रस्ताव शासनाकडे गेल्यानंतर सध्याचे जलसंधारण प्रा. तानाजी सावंत यांनी सदरच्या कामामध्ये खास बाब म्हणून मंजुर केलेले आहे. सध्या २ कोटी ८ लाख ७२ हजारच्या निधीच्या कामासाठी ई-निविदा प्रक्रियेला सुरवात झालेली असून लवकरच कामे सुरु होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies