Type Here to Get Search Results !

बहुजन ब्रिगेड विधानसभा निवडणूक लढविणार--किरण साठे


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
माळशिरस/संजय हुलगे : बहुजन ब्रिगेड संघटनेचा माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मेळावा माळशिरस येथील सावता माळी मंगल कार्यालय संपन्न झाला. या मेळाव्याला बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आप्पासाहेब भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश पाटील, बापू वाघमारे, बळीराजा शेतकरी संघटनेचे अजित बोरकर, बहुजन मुक्ती पार्टीचे काकासाहेब जाधव, महेंद्र साठे, राजू आगलावे, अविराज माने, मल्हारी लोखंडे, सचिन मोरे, आबा भिसे,विकास बनसोडे, अजिनाथ साठे, सागर कोळी, उदय कांबळे, आशु ढवळे, अमोल लोंढे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. 
सदर मेळाव्याला संबोधित करताना संघटनेचे अध्यक्ष किरण साठे म्हणाले, माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत बहुजन ब्रिगेड संघटना उमेदवार उभा करणार आहे. यामध्ये स्वतः मी, आबा भिसे, रुक्मिणी रणदिवे, अनिल साठे, ऋषीपाल बनसोडे या पैकी संघटनेचा उमेदवार असणार आहे.
यावेळी बहुजन ब्रिगेडचे मोठ्या संख्येने व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रमात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आप्पासाहेब भोसले, आबा भिसे, काका जाधव, रमेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल साठे यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्ता कर्चे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies