श्री.शंकर सह साखर कारखाना लि. सदाशिवनगर या कारखान्याची वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, September 29, 2019

श्री.शंकर सह साखर कारखाना लि. सदाशिवनगर या कारखान्याची वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सदाशिवनगर/सदाशिव भोंगळे : श्री.शंकर सह साखर कारखाना लि. सदाशिवनगर या कारखान्याची वार्षिक सर्व साधारण सभा उत्स्फूर्तपणे पार पडली. या सभेला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह (दादा) मोहिते-पाटील, कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील, धर्यशील मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, व्हा. चेअरमन मिलींद कुलकर्णी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, पंचायत समितीचे उपसभापती किशोर सूळ, शंकर सह कारखान्याचे सर्व संचालक, पंचायत समिती सदस्य, जि.प सदस्य, कारखान्याचे सर्व सभासद व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कारखान्यातील विविध मागणी असणारे 11 विषयाचे वाचन करून सर्वानुमते त्या सर्व विषयांना मंजूरी देण्यात आली. तसेच या सर्व विषयांना चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक यांच्या उपस्थितीत अनुमती घेऊन मान्यता देण्यात आली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात 52 वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री. शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर येथे पार पडली.   तसेच कारखाना लवकरच शेतकऱ्यांची बिले देईल. शेतकऱ्यांची बिले, सर्व कामगारांचेही पगार दिले जातील अशी ग्वाही दिली. हे दिल्याशिवाय कारखाना क्रशिंग करण्यास शासन मान्यता देत नाही असे कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील आपल्या भाषणात सांगिलते. त्यामुळे लवकरच शेतकरयांची व कामगारांचे थकित पगार मिळणार आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise