आम. अनिलभाऊ बाबर यांना युती जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेकडून एबी फॉर्म वाटप - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, September 29, 2019

आम. अनिलभाऊ बाबर यांना युती जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेकडून एबी फॉर्म वाटप

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : खानापूर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान आम. अनिलभाऊ बाबर यांना युती होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी ए.बी. फॉर्म दिला आहे. 
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र तत्पूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उमेदवारांना एबी फॉर्म वाटप केले आहे. त्यामध्ये खानापूर विधानसभा मतदार संघातून अनिलभाऊ बाबर यांना सेनेचे पुन्हा संधी दिली आहे. 
गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिवसेना-भाजपायुती कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्म वाटप झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आता युती झाली नाही तरी भाजपचे उमेदवार कोण? जे अजून ठरले नाही तर माजी आमदार सदाशिवरावभाऊ पाटील यांनी ही जोरदार तयारी केली असून ते विधानसभा लढणार हे नक्की परंतु त्यांचा पक्ष अजून ठरलेला नाही, तर आटपाडी तालुक्यातून मात्र आटपाडी तालुक्याचा आमदार झाला पाहिजे यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख आग्रही आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise