बिरसा क्रांती दल वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, September 22, 2019

बिरसा क्रांती दल वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सांगली : बिरसा क्रांती दल सांगली जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी मोसमी बर्डे यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका विद्यमान नगरसेविका सौ स्वाती पारधी, बिरसा क्रांती दल पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, सांगली जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र पाडवी, पलूस तालुका सल्लागार उल्हास भांगे, सह्याद्री आदिवासी कर्मचारी असो सांगली जिल्हा अध्यक्ष एस.पी. जोशी, सुरेख पारधी, देवराम मावळे, शिवाजी लांडे, आर.डी.सांळुखे, रमेश चव्हाण, तानाजी चव्हाण, आदि. नागरिक उपस्थित राहणार आहेत.

आंबवणे म्हणाले, सुशील कुमार पावरा यांना कामवर रूजू करावे. पावरा त्यांना जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई सुरू ठेवण्यात येईल. पावरा हे आदिवासी शिक्षक आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदच्या व पंचायत समिती खेड या ठिकाणच्या शिक्षण विभागातील अधिकारी कट करून सुशिल कुमार पावरा यांना निलंबित केले व नंतर बडर्तफ केले. पावरा आदिवासी असल्याने असा अन्याय केला आहे. त्यामुळे तेथील अधिकाऱ्यावर अँट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा व सुशिल कुमार पावरा यांना न्याय द्यावा व बडर्तफ चे आदेश रद्द करावे.

No comments:

Post a Comment

Advertise