विश्वंभर बाबर यांना शासनाचा कृषिक्षेत्रातील सर्वोच्च कृषिरत्न पुरस्कार जाहीर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, September 22, 2019

विश्वंभर बाबर यांना शासनाचा कृषिक्षेत्रातील सर्वोच्च कृषिरत्न पुरस्कार जाहीर


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
म्हसवड/अहमद मुल्ला :राज्यशासनाच्या कृषिविभागामार्फत दिला जाणारा कृषिक्षेत्रातील सर्वोच्च डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार म्हसवड येथील प्रा.विश्वंभर बाबर यांना नुकताच  जाहिर झाला आहे.
गेल्या २५ वर्षात प्रा.विश्वंभर बाबर यांनी माण तालुका व परिसरात कृषिक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन   राज्यशासनाच्या कृषिविभागामार्फत दिला  जाणारा कृषिक्षेत्रातील सर्वोच्च डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कारासाठी  म्हसवड येथील प्रा.विश्वंभर बाबर यांची निवड करण्यात आली आहे.
 माण तालुक्यात भगवा डाळिंब लागवड व तंत्रशुद्ध उच्चांकी उत्पादन, कोरडवाहू शेती, फळे व भाजीपाला उत्पादन, कृषितंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार तसेच पशुसंवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन राज्यशासनाने यापूर्वी राज्यपातळीवरील शेतीमित्र पुरस्कार तसेच वृक्षारोपण क्षेत्रातील राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार त्यांना दिला आहे.
 कृषिक्षेत्राबरोबरच शॆक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात प्रा.बाबर यांचे मोलाचे योगदान आहे. कृषिरत्न पुरस्काराबद्दल प्रा.बाबर यांचे सामाजिक, राजकिय,शॆक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर, प्रशासकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी अभिनंदन  केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise