खरसुंडीत कर्मवीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, September 22, 2019

खरसुंडीत कर्मवीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा

कर्मवीर जयंतीनिमित्त खरसुंडी येथे काढण्यात आलेली भव्य शोभायात्रा
माणदेश एक्सप्रेस न्यूज
खरसुंडी/मनोज कांबळे : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त विद्यालयाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पारंपारिक पोशाखातील विद्यार्थी व लेझीम व ढोल ताशा पथकांचा सहभागामुळे ही शोभायात्रा लक्षवेधी ठरली.
श्री सिध्दनाथ विधालय व कनिष्ठ महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे दक्षिण विभाग सल्लागार विलासनाना शिंदे, मुख्याध्यापक रविंद्र पुजारी, पर्यवेक्षक नलवडे, भरत पाटील व स्कूल कमिटी सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावातून शोभायात्रा काढण्यात आली. सजवलेल्या रथामध्ये कर्मवीरांचे भव्य तैलचित्र ठेवण्यात आले होते. अग्रभागी विविध पारंपारीक वेशभूषा केलेले विद्यार्थी सहभागी झाले होते. मिरवणूकीत विद्यालयाचे टिपरी व लेझीम पथक तर नाथ युवा ढोल ताशा पथकाचा सहभागामुळे मोठा उत्साह निर्माण झाला होता. गावातील प्रमुख मार्गावरून हि शोभायात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी नागरिकांनी कर्मवीरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे संयोजन विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग व कर्मचारी वर्गाच्या वतीने करण्यात आले होते. 


No comments:

Post a Comment

Advertise