उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल करण्यापूर्वी निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक - जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 23, 2019

उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल करण्यापूर्वी निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक - जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी निवडणूक नामनिर्देशन दाखल करण्यापूर्वी किमान एक दिवस आधीपर्यंत निवडणूक खर्चाकरिता स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे. निवडणूक नामनिर्देशन दाखल करतेवेळी करण्यात येणारा आवेदन शुल्क, अनामत रक्कम, प्रतिज्ञापत्र व इतर अनुषांगिक बाबीवर येणारा खर्च निवडणूक कार्यासाठी उघडण्यात येणाऱ्या स्वतंत्र बँक खात्यातून होणे आवश्यक आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणुकीच्या संदर्भातील सर्व व्यवहार देखील याच बँक खात्यातून केले जाणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी निवडणूक कार्यासाठी त्यांच्या सोयीच्या राष्ट्रीयकृत बँक / शेड्यूल बँक / सहकारी बँक इत्यादी बँकेमध्ये नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यापूर्वीच किमान एक दिवस आगोदर पर्यंत खाते उघडून कार्यान्वित करून घ्यावे. याबाबत काही समस्या अथवा अडचणी असल्यास जिल्हा खर्च सनियंत्रण नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर यांच्याशी 9004930459 /7020484332 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते न उघडणे किंवा निवडणूकीचा खर्च निवडणूकीसाठीच्या स्वतंत्र बँक खात्यातून न करणे ही बाबत नियमभंग करणार आहे, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise