हातात बॅट धरायला आले म्हणून कोणी धोनी होत नाही,आणि राष्ट्रवादीला सोडून गेलेला कधी खासदार होत नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा उदयनराजे याना अप्रत्यक्षपणे इशारा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 23, 2019

हातात बॅट धरायला आले म्हणून कोणी धोनी होत नाही,आणि राष्ट्रवादीला सोडून गेलेला कधी खासदार होत नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा उदयनराजे याना अप्रत्यक्षपणे इशारामाणदेश एक्सप्रेस न्यूज  
आटपाडी: हातात बॅट धरायला आले म्हणून कोणी धोनी होत नाही,आणि राष्ट्रवादीला सोडून गेलेला कधी खासदार होत नाही; असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा उदयनराजे याना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त काल दि. २२ रोजी सातारा शहरात आले होते. त्यावेळी सातारा शहरात राष्ट्रवादीची सभा झाली यावेळी. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले “हातात बॅट धरायला आले म्हणून कोणी धोनी होत नाही, आणि राष्ट्रवादीला सोडून गेलेला कधी खासदार होत नाही’ अशी सुरुवात यांनी आपल्या भाषणाची केली. ते म्हणाले शरद पवार साहेबांनी मी कितीतरी वेळा संगितले होते की, पक्षाला आव्हान देणारी माणसे आपणास नकोत. परंतु त्यावेळी माझे वय कमी असल्यामुळे कोणी मनावर घेतले नाही. परंतु आता त्याचा पश्चाताप होत आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise