कर्मवीर आण्णा शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतिकारक:-प्रा.विश्वंभर बाबर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 23, 2019

कर्मवीर आण्णा शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतिकारक:-प्रा.विश्वंभर बाबर


माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर आण्णा यांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती केली असून ते शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतिकारक आहेत, असे प्रतिपादन क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.विश्वंभर बाबर यांनी म्हसवड येथे केले.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलामध्ये कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने  रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.  यावेळी संस्थेच्या सचिव सुलोचना बाबर, मुख्याध्यापक अनिल माने, के.के. अनुरूप, प्राचार्य विठ्ठल लवटे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा.बाबर पुढे बोलताना म्हणाले,  माण तालुका जरी दुष्काळी असला तरी शैक्षणिकदृष्ट्या सुकाळी बनविण्याचे महान कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. त्यामुळेच आज माण मध्ये सर्वात जास्त प्रशासकीय अधिकारी आहेत. शिक्षणातून  विकासाची दृष्टी देणारे आण्णा हे खरे समाज सुधारक होते. त्यांचे कार्य त्या शतकातील मानदंड  ठरलेले आहे. आण्णांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती केली असून ते शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतिकारक ठरले आहेत. शैक्षणिक क्रांतीमुळे समाज क्रांती घडली. त्यातून सर्व गरीब दलित शेतकरी कुटुंबातील लाखो विद्यार्थांना घडविण्याचे थोर काम कर्मवीर आण्णानी केले आहे. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हा संदेश शैक्षणिक क्रांतीतून दिला. शिक्षणाच्या माध्यमातून देश घडवावा असे आवाहन प्रा.बाबर यांनी केले. यावेळी विद्यालयातील वैष्णवी मासाळ व पायल कापसे यांनी कर्मवीर आण्णांविषयी भाषण केले. 
कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने  रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी संकुलातील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा बनगर यांनी केले व आभार वैष्णवी साळुंखे हिने मानले.

No comments:

Post a Comment

Advertise