माळशिरस नगरपंचायतीच्या विविध विकास कामाचे भुमिपुजन; नगरपंचायतिने दिला विकास कामावर दिला भर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 20, 2019

माळशिरस नगरपंचायतीच्या विविध विकास कामाचे भुमिपुजन; नगरपंचायतिने दिला विकास कामावर दिला भर


माणदेश एक्स्प्रेस न्यूज 
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी नुकत्याच निवड झालेल्या द्रौपदी देशमुख यांनी नगरपंचायत भागात विकास कामाचा सपाटाच लावला आहे. त्यांनी शासनच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत माळशिरसनगर पंचायत अंतर्गत अकलूज रस्ता ते साईनगर कॉलनी रस्ता डांबरीकरण करणे व आरसीसी गटार बांधणे अंदाजपत्रकीय रक्कम ४३ लाख ६७ हजार रू.,  बोंत्रे यांचे कापड दुकान ते वनवे गल्ली ते अकलूज रस्त्या पर्यंतचा रस्ता डांबरी व आरसीसी गटार बांधण्यासाठी ३६ लाख ५८ हजार रू., पंढरपूर रस्ता सावतामाळी मंदिर ते बोराटे मळ्यापर्यंतच्या रस्ता डांबरीकरणास ५२ लाख २८ हजार  रुपये, म्हसवड रस्ता ते शहा धारशी पेट्रोल पंप पंढरपूर रस्त्यापर्यंतचा रस्ता डांबरीकरणास ३६ लाख ३५ हजार रु., अकलूज रस्ता अथर्व मेडिकल ते रविराज वाणी घर ते कॅनॉल पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्यास आरसीसी गटार बांधण्यास २४ लाख ७० हजार  रुपये, अकलूज रस्ता ते दीपक मंजुळे यांचे घरापर्यंतचा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व आरसीसी गटार  बांधण्यास २४ लाख ७० हजार रुपये, म्हसवड रोड (चाहुरवस्ती पुलाकडील) ते शिंदे वस्ती पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, दलित्तेर योजनेतून १३ लाख ९८ हजार रुपये, माळशिरस शहरात बजरंग वस्ती व माळी गल्ली व वनवे गल्ली येथे DI विविध ठिकाणी नवीन पाईप टाकणे, नवीन नगरपंचायत २३ लाख ७४ हजार  अशा कामांचे भूमिपूजन नुकतेच विविध मान्यवरांचे हस्ते पार पडले.
यावेळी नगराध्यक्षा द्रोपदी देशमुख, उपनगराध्यक्ष मारूती पाटील, नगरसेवक संजिवनी पाटील, नगरसेवक आप्पासाहेब देशमुख, रजना पिसे, नुतन वाघमोडे, रणजीत मोटे, मारूती देशमुख, संतोष वाघमोडे, आबा धांईजे, विजय देशमुख, सोमनाथ वाघमोडे,  आकाश सावंत, गंगाधर पिसे, सुनिल इंगळे, सुरेश वाघमोडे, ज्ञानेश्वर जमदाडे, विष्णू केमकर, मैहमुद मुलाणी, अमर काळे, प्रताप देशमुख, रमेश पिसे, बाजी पिसे, बाजीराव कोळी, संजय आडके, महेश बोत्रे, राजु पवार, बापुराव वनवे, मल्हारी टेळे, भुईटे गुरुजी, अनिल चव्हाण, तुकाराम वाघमोडे, तुकाराम गायकवाड, भगवान लष्करे, संजय गायकवाड, अशोक राऊत, सागर धाईजे, राजेंद्र धायगुडे, प्रशांत वाघमोडे, रावसाहेब देशमुख, अरविंद लष्करे, अतुल देवकर, गणेश कुलकर्णी, अनिल गायकवाड, प्रमोद मंजुळे, मतीन बिदरे सह इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise