शेतात मेंढरे फिरविण्याच्या कारणावरून गोमेवाडीत महिलेस मारहाण; आटपाडी पोलिसात चौघाविरोधात गुन्हा दाखल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 20, 2019

शेतात मेंढरे फिरविण्याच्या कारणावरून गोमेवाडीत महिलेस मारहाण; आटपाडी पोलिसात चौघाविरोधात गुन्हा दाखल


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
आटपाडी : शेतात मेंढरे फिरवण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोमेवाडी, मेटकरवस्ती येथील रूपाली किरण खरात यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. यामध्ये  आबा आण्णा काळे, रावासो आण्णा काळे, मंगल आण्णा काळे, रेखा रावसो काळे रा. मेटकरवस्ती, गोमेवाडी यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रूपाली किरण खरात व त्यांची आई शांताबाई यांनी माळरानावरील शेतात मेंढरे हिंडवले या कारणावरून काळे कुटुंबीयांनी रूपाली खरात यांना दगड काठीने मारहाण केली जीव मारण्याची धमकी दिली.

No comments:

Post a Comment

Advertise