हिवतड येथील लांडग्यांच्या हल्यात ठार झालेल्या मेंढ्यांच्या कुटुंबियाची काँग्रेस नेते राजाराम देशमुख यांनी घेतली भेट; कुटुंबियाला दिली ५१ हजाराची मदत - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 20, 2019

हिवतड येथील लांडग्यांच्या हल्यात ठार झालेल्या मेंढ्यांच्या कुटुंबियाची काँग्रेस नेते राजाराम देशमुख यांनी घेतली भेट; कुटुंबियाला दिली ५१ हजाराची मदत


माणदेश एक्सप्रेस न्युज  
आटपाडी: हिवतड येथील शुकाचार्य डोंगरा लगत धनगर बांधवाच्या मेंढ्यांच्या कळपावर लांडग्याने हल्ला करून मेंढ्या मारून टाकल्याची घटना घडली असून याची माहिती मिळताच गलाई एकता असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष व काँग्रेस कमिटीचे राज्य सरचिटणीस राजाराम देशमुख यांनी हिवतड येथे  घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
आटपाडी तालुक्यातील  हिवतड गावातील नुकसान झालेल्या धनगर मेंढपाळाची जाऊन चौकशी केली. यावेळी त्यांनी नुकसान झाल्याचे पाहून धनगर बांधवांना 51 हजार रुपयांची मदत केली.  तर मेंढपाळच्या मेंढ्या लांडग्याच्या हल्ल्यात मेल्या त्या मेंढपाळाला शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राजाराम देशमुख यांनी केली आहे. हिवतड येथील डोंगरात व शेतात राहणारे शेतकरी कुटुंब लांडग्याच्या हल्ल्याने भयभीत झाले आहेत. 

No comments:

Post a Comment

Advertise