माण तालुका शालेय खोखो स्पर्धेमध्ये दिवड, दहिवडी, मार्डी चे संघ विजयी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 13, 2019

माण तालुका शालेय खोखो स्पर्धेमध्ये दिवड, दहिवडी, मार्डी चे संघ विजयी


माणदेश एक्सप्रेस न्युज 
 म्हसवड /अहमद मुल्ला  :  म्हसवड येथील सिद्धनाथ हायस्कूल व ज्यू. कॉलेगमध्ये संपन्न झालेल्या माण तालुका शालेय खोखो स्पर्धेमध्ये खालील शाळांच्या संघांनी विजय प्राप्त केले आहेत. यामध्ये १४  वर्षाखालील मुले  इंदिरा गांधी विद्यालय दिवड चा संघ विजयी ठरला. तर महालक्ष्मी विद्यालय मोही हायस्कूल संघ उपविजयी ठरला. मुलींच्या या गटात इंदिरा गांधी विद्यालय दिवड चा संघ विजयी ठरला तर महांकाळेश्वर विद्यालय धुळदेव चा संघ उपविजयी ठरला. १७  वर्ष मुलांच्या गटामध्ये छत्रपती शिवाजी विद्यालय मार्डी चा संघ विजयी तर इंदिरा गांधी विद्यालय दिवड उपविजयी ठरला. मुलींच्या गटामध्ये गांधी विद्यालय दिवड मुलींचा संघ विजयी ठरला. तर माध्यमिक विद्यालय पानवनचा संघ उपविजयी ठरला आहे. १९ वर्ष मुलांच्या गटात  दहिवडी कॉलेज दहिवडीचा संघ विजयी तर महालक्ष्मी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मोहीचा संघ उपविजयी ठरला आहे. मुली इंदिरा गांधी विद्यालय दिवडचा संघ विजयी तर सिद्धनाथ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज म्हसवड चा संघ उपविजयी ठरला आहे. सर्व गटातील प्रथम क्रमांकांच्या संघांची निवड जिल्हापातळीसाठी करण्यात आली आहे.  वरील सर्व संघांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन विस्तार अधिकारी संगिता गायकवाड, सिद्धनाथ हायस्कूल स्कूल कमिटीचे व्हा.चेअरमन श्रीमंत ॲड. पृथ्वीराज राजेमाने, सदस्य नितीनभाई दोशी, प्राचार्य एम्.जी.नाळे, उपप्राचार्य ए.बी. शिंदे, पर्यवेक्षक टी.ए. गावडे, केंद्रप्रमुख बाळासाहेब पवार, उदय जाधव ,  माण तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षक संघाचे अध्यक्ष महेश बडवे यांचेसह अनेक मान्यवरांनी केले आहे. या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महेश सोनवले, रमेश सावंत, नवनाथ जाधव, राजेश विरकर, विनोद शिंदे, विष्णू काळेल या सर्वांच्या सहकार्यने स्पर्धा पार पडल्या.

No comments:

Post a Comment

Advertise