Type Here to Get Search Results !

सातारा जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने पुरग्रस्तांनसाठी मदत


माणदेश एक्सप्रेस न्युज 
म्हसवड/अहमद मुल्ला : सातारा जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या वतीने कराड तालुक्यातील दुशेरे व मिरज तालुक्यातील समडोळी येथील पुरग्रस्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मदत करण्यात आली. या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले.
शाहीन हायस्कुल कराड येथे संघटनेच्या वतीने पुरग्रस्त भागातील शिक्षकेतर कर्मचारी मदत केंद्र सुरू करून संघटनेच्या वतीने जिल्ल्यातील सेवकांना मदतीचे आवाहन करणेत आले होते. यासाठी शाहीन हायस्कुलचे मुख्याध्यापक सय्यद सर, जिल्हा शिक्षकेतर सेवक संघटनेचे अध्यक्ष अनिल माने, सहकार्यवाहक इंगवले सर, कराड तालुका अध्यक्ष इम्रान मुल्ला, राजेंद्र घोरपडे, रत्नाकर शानभाग इत्यादी पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला.
 सांगली,कोल्हापूर,सातारा जिल्ह्यातील पुरपरिस्थितीमुळे त्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यावेळी संघटनेचे सहकार्यवाहक रमेश इंगवले यांनी पुरग्रस्त भागातील शिक्षकेतर कर्मचारी यांना मदत करण्याची भावना व्यक्त करून जिल्ल्यातील सर्व सेवकांना मदतीचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सेवकांनी मदतीचा हात पुढे केला होता. जमा झालेली मदत पुरामुळे उद्धवस्त झालेल्या आपल्याच बांधवांना मदत देण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. कराड तालुक्यातील दुशेरे येथील रवींद्र तुकाराम देशमुख या सेवक व मिरज तालुक्यातील समडोली येथील श्रीमती एस.एस. गुंजाटे यांना मदत देण्यात आली. पुरग्रस्त सेवकांना दहा हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी संघटनेचे सुरेश शेडगे, लक्ष्मण खामकर, मनोहर महाडिक, जगदीश भोसले, ज्ञानेश्वर कदम, सुरेश कदम, सुरेश वाडते, अविनाश बागडे, नामदेव पाटील आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies