गोपीचंद पडळकरांनी दिला वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा; सांगलीत पत्रकार परिषेदेत केली घोषणा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, September 26, 2019

गोपीचंद पडळकरांनी दिला वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा; सांगलीत पत्रकार परिषेदेत केली घोषणा


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सांगली : वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांनी आज सांगली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिला असल्याची घोषणा केली.
यावेळी ते म्हणाले, सर्व कार्यकत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. आज पासून वंचित बहुजन आघाडीचे काम थांबवले आहे असे ते म्हणाले. तसेच भाजपमध्ये प्रवेश करणार का असे विचारले असता त्यांनी आज काही सांगता येत नाही असे ते म्हणाले, भाजप सरकारने धनगर आरक्षणाचे काही प्रश्न सोडविले आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या काही योजना लागू केल्या आहेत, तसेच १००० कोटी समाजाच्या विविध योजनांना दिले असल्याचे ते म्हणाले, तसेच भारतीय जनता पार्टीने आमच्या बाबतीत सकारात्मक चर्चा केली आहे. भाजपमध्ये जाणार का विषयी विचारले असता मला सगळ्याच पक्षाची ऑफर असून मी दोन दिवसांनी निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. माझ्या आंदोलनाच्या चळवळीत लोकभावना महत्वाच्या आहेत, तसेच जो निणर्य घेतला जाईल तो सगळ्या कार्यकर्त्यांना विचारून घेतला जाईल असे ते म्हणाले. त्यामुळे सांगली जिल्हयात वंचित बहुजन आघाडीला मात्र याचा फटका विधानसभेला बसणार हे मात्र निश्चित.

1 comment:

Advertise