Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार बी.डी.ओंच्या खात्यातून थेट शिक्षकांच्या खात्यावरती वर्ग व्हावेत; प्राथमिक शिक्षक समितीची निवेदनाद्वारे मागणी


माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या पगाराच्या विषयासंदर्भात गटविकास अधिकारी मधुकर देशमुख यांना गटविकास अधिकाऱ्यांच्या खात्यातून थेट शिक्षकांच्या खात्यावरती पगार व्हावेत अशा मागणीचे निवेदन आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आले.
केंद्रप्रमुख यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने व एका केंद्रप्रमुखांकडे तीन ते चार केंद्रांचा अधिभार असल्याने जिल्हा परिषदेतून वेळेत पैसे आले तरीही, पगार होण्यास विलंब होतो. म्हणून इतर तालुक्या प्रमाणे गटविकास अधिकाऱ्यांच्या खात्यातून थेट शिक्षकांच्या पगार खात्यावर ती रक्कम वर्ग झाल्यास होणारा विलंब टळेल. 
गतवर्षी दि. ७, ८, व ९ ऑगस्ट २०१८ ला झालेल्या सर्व राज्य कर्मचाऱ्यांच्या संपात आटपाडी तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक सहभागी होते. त्यांचा ३ दिवसांचा पगार कपात करण्यात आला होता. तरी सदरचे ३ दिवसांचा  कालावधी अर्जित रजेत परावर्तीत करून पगार काढावा अशी विनंती करण्यात आली. तर वित्त विभागाशी यासंदर्भात सकारात्मक चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. सदरचे निवेदन गटशिक्षणाधिकारी अंनिस नायकवडी यांनाही सादर करण्यात आला. 
यावेळी शिष्टमंडळात सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक यु.टी.जाधव, तालुकाध्यक्ष शामराव ऐवळे, मार्गदर्शक रमेश हेगडे, शिक्षक नेते संजय कबीर, सरचिटणीस प्रविण बाड, विभाग सचिव दिपक कुंभार, आदर्श शिक्षक अजय राक्षे, ज्येष्ठ नेते हैबतराव पावणे,  तंत्रस्नेही सत्यवान माने, संघटक श्रीकांत कुंभार, उपाध्यक्ष रविंद्र सावंत, प्रसिध्दी प्रमुख भास्करराव डिगोळे, सल्लागार योगीराज कुंभरे, पांडुरंग ऐवळे, दादासो लोखंडे, सर्जेराव पुजारी, जनार्दन मोटे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies