Type Here to Get Search Results !

विकासकामांच्या जोरावर पुन्हा सेवा करण्याची संधी द्या : खा. संजय पाटील : खा. पाटील यांच्या प्रचारार्थ आटपाडी तालुक्यात विविध ठिकाणी सभा : धनगाव योजनेचे पाणी एका महिन्यात तालुक्यातील प्रत्येक गावात : अमरसिंह देशमुख

विकासकामांच्या जोरावर पुन्हा सेवा करण्याची संधी द्या : खा. संजय पाटील
खा. पाटील यांच्या प्रचारार्थ आटपाडी तालुक्यात विविध ठिकाणी सभा
धनगाव योजनेचे पाणी एका महिन्यात तालुक्यातील प्रत्येक गावात : अमरसिंह देशमुख
 माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : धनगाव योजनेचे पाणी एका महिन्यात आटपाडी तालुक्यात सर्व गावांना पिण्यासाठी मिळणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंहबापू देशमुख यांनी काढले. सांगली लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार खा. संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आटपाडी तालुक्यातील शेटफळे, तडवळे, यपावाडी, आटपाडी, दिघंची येथे सभा संपन्न झाल्या. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
आटपाडी येथील तांबडा मारुती मंदिर येथे बोलताना अमरसिंहबापू म्हणाले, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारने गेल्या ४० वर्षात फसविण्याचे काम केले असून, अजूनही ४० वर्षापूर्वीचे प्रश्न आहे तसेच आहेत. पाठीमागे काय केले, पुढे काय करणार, भविष्यात काय करणार? याचे उत्तर सध्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडे नाही. शेतीच्या पाण्याच्या प्रश्न आहे तसा आहे. आम्ही १९९५ साली युती सरकारला पाठींबा दिला. त्यावेळी टेंभू योजना मंजूर केली व तिचे ७० टक्के काम झाले. परंतु नंतर आलेल्या सरकारने अनुशेषाच्या नावाखाली पश्चिम महाराष्ट्राला नेहमी दुजाभावाची वागणूक दिली. परंतु खा. संजयकाका पाटील यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेल्या संबंधामुळे तसेच मोदी सरकारची दमदार कामगिरी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळेच आज टेंभू योजनेस १२०३ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. तसेच भारतात लोकशाही असल्यामुळे तुमच्याकडे अनेक उमेदवार येथील भूलथापा मारतील, शिव्या देतील परंतु घरी गेल्यावर शांत विचार करा व योग्य निर्णय घ्या. येथील पुढील काळात टेंभूचे काम पूर्ण करण्यासाठी, त्याची आवर्तने निश्चित करण्यासाठी व मोदी सरकारचे हात बळकट करण्यासाठी संजयकाका पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
उमेदवार संजयकाका पाटील म्हणाले, जिल्ह्यातील ताकारी, म्हैशाळ, टेंभू या योजना पूर्ण करून त्या पूर्ण ताकदीने सुरु करायच्या आहेत. सध्या या योजनेचे पाणी फार लांबून येत असून, पाठीमागे पाणी उपसा करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने शेवटच्या टोकाला पाणी कमी मिळत आहे. याचा सारासार विचार करून या योजनांचा समावेश बंद पाईपलाईन मध्ये करण्यात आला असल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी जाणार आहे. त्याचबरोबर आता १ एमसीएफटी पाण्यासाठी फक्त शेतकऱ्याला १५ ते १८ हजार रुपये भरावे लागणार आहे. पूर्वीच्या सरकारने फक्त अनुशेषाचे कारण पुढे करत या योजनांना निधी नाकारला होता. परंतु फडणवीस व मोदी सरकारने मात्र वेगळ्या मार्गाने का होईना मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. तसेच जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग, रांजणीला ड्रायपोर्ट मंजूर झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांचा निधी आणला आहे. त्यामुळे आता वसंदादांच्या नावाने मते मागण्याचे दिवस संपले असल्याचा टोला त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांना लगावला तर दुसरा उमेदवार हा जाती-पातीचे राजकारण करत असल्याने जातीच्या मुद्यावर आता राजकारण करण्याचे दिवस संपले असल्याचे सांगत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना बेदखल केले. त्याचबरोबर केलेल्या विकासकामाच्या जोरावरच आपणाला मतदान करण्याचे आवाहन करत दुध का दुध व पाणी का पाणी होईल असे म्हणाले.
प्रारंभी प्रास्ताविक करताना समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी मागील खासदार प्रतिक पाटील हे चार-चार दिवस फोन उचलत नाहीत, त्यामुळे अशा लोकांना निवडून देणार का? असा प्रश्न करत संजयकाका पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी जि.प.सदस्य अरुण बालटे, प्रमोद शेंडगे, बाजार समितीचे संचालक ऋषीकेश देशमुख, आटपाडीचे युवा नेते अनिलशेठ पाटील, विनायक मासाळ, भाजपचे जेष्ठ नेते दिपकबाबा शिंदे-म्हैशाळकर, तासगावचे नगराध्यक्ष डॉ. सावंत यांच्याबरोबर प्रत्येक गावचे सरपंच, सदस्य यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies