Type Here to Get Search Results !

भाजप जिल्हाध्यक्षाची चक्क आमदाराला लाथा बुक्यांनी मारहाण : मंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की,मारहाण

भाजप जिल्हाध्यक्षाची चक्क आमदाराला लाथा बुक्यांनी मारहाण 
मंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की,मारहाण 
जळगाव: अमळनेर येथील भाजप- शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये जोरदार राडा झाला असून यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना ही मारहाण व धक्काबुक्की करण्यात आली आहे. तसेच भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांच्यातही हाणामारी झाली.मात्र या मारहाणीमागचे नेमके कारण हे समोर येऊ शकलेले नाही. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असल्याने भाजपची मात्र पुरती नाचक्की झाली आहे.

 भाजप - शिवसेना युतीच्या मेळाव्यासाठी अमळनेर येथे येत असताना राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या वाहनांचा ताफा पाडळसरे धरण कृती समितीच्या पदाधिकारी यांनी रोखला. हा प्रकार बुधवारी सायंकाळी ५.४५ वाजणेच्या सुमारास अमळनेरच्या प्रवेशद्वाराजवळ घडला. 
पाडळसरे धरण पुर्ण करण्यात यावे, अशी मागणी कृती समितीच्या  पदाधिकाºयांची होती. वाहनांचा ताफा अमळनेरात शिरताच तिथे हातात झेंडे घेऊन उभ्या असलेल्या पदाधिका-यांनी पुढे येऊन तो रोखला. वाहने थांबताच गिरीश महाजन हे खाली उतरले आणि या समितीच्या पदाधिका-यांशी त्यांनी चर्चा केली. पाडळसरे धरणासाठी अडीच हजार कोटी रुपये देण्यात आले असल्याचे महाजन यांनी सांगितले. यानंतर त्यांच्या वाहनाचा ताफा मेळाव्याच्या ठिकाणी रवाना झाला. महाजन यांच्यासोबत जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील हे ही होते. 
यावेळी खुद्द गिरीश महाजन यांना मारहाण करणाऱ्या जमावाला त्यांना रोखावे लागले त्यामुळे त्यांची मोठी तारांबळ उडाली होती. त्याचवेळी पोलीस व्यासपीठावर नव्हते हीच संधी साधत भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी खाली पडलेल्या माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांना लाथा मारल्याचे स्पष्ट दिसत आहे. परंतु मी कार्यकर्ते यांना आवरतो होते असे उत्तर दिले असले तरी त्यांनी मारहाण केली असल्याचे उघड झाले आहे.
विद्यमान खासदार ए.टी. नाना पाटील यांची उमेदवारी कापल्यावर त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती व मुख्यमंत्री यांचे लाडके असलेले मंत्री एक दिवस त्यांच्यामुळे गोतात येथील असे सांगितले होते ते खरे होते कि काय? अशी शंका आता येवू लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies