लतादेवी सिद यांनी माळशिरस नगराध्यपदाचा पदभार स्वीकारला: उपनगराध्यक्ष डॉ मारुती पाटील, आप्पासाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित, नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांतर्फे कार्यालयीन अधिक्षक भाग्यश्री बेडगे यांनी सिद यांचा केला सत्कार . - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, April 8, 2019

लतादेवी सिद यांनी माळशिरस नगराध्यपदाचा पदभार स्वीकारला: उपनगराध्यक्ष डॉ मारुती पाटील, आप्पासाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित, नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांतर्फे कार्यालयीन अधिक्षक भाग्यश्री बेडगे यांनी सिद यांचा केला सत्कार .

लतादेवी सिद यांनी नगराध्यपदाचा पदभार स्वीकारला 
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे: नुकत्याच झालेल्या माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीत लतादेवी सिद यांची निवड झाली होती. त्यामुळे मावळत्या नगराध्यक्षा मनिषा इंगळे यांनी नुतन नगराध्यक्ष लतादेवी सिद यांचेकडे आपला पदभार सुपुर्त केला. यावेळी उपनगराध्यक्ष डॉ मारुती पाटील, आप्पासाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. तर नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांतर्फे कार्यालयीन अधिक्षक भाग्यश्री बेडगे यांनी सिद यांचा सत्कार केला.
माळशिरस  नगर पंचायत पुढे सध्या अनेक प्रश्न भेडसावत आहेत. घरकुल योजना, पाणी, स्वच्छ भारत मिशन अशा प्रमुख गोष्टीं आहेत. त्यात सिद यांना यापुर्वीचा राजकीय वारसा आहे त्यामुळे त्यांच्या निवडीमुळे शहरवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. नव्या नगराध्यक्षांपुढे मोठे आव्हाण ठरणार आहे . या पदग्रहण कार्यक्रमासाठी  आबा धांईजे, गंगाधर पिसे, अशोक वाघमोडे, सचिन वावरे, गोरख देशमुख, आकाश सिद, रावसाहेब देशमुख, आबा वाघमोडे, विजय देशमुख, धनाजी देवकर, हनुमंत सोनवणे, गणेश कुलकर्णी, लेखापाल समाधन चव्हाण  कार्यालयीन अधिक्षक भाग्यश्री बेडगे, विशाल सावंत, ध्रुवकुमार सोनवणे, नाना गोरे, सुनिल मदने, भगवान वाघमोडे, निलेश कस्तुरे, रत्नमाला सिदवाडकर, भाग्यश्री कुलकर्णी, आशा सिद, अस्मिता जाधव आदी मान्यवर उपस्थीत होते.
सध्या शहरातील पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. दुष्काळामुळे पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे यासाठी बैठक घेऊन यावर उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे. शिवाय नगरपंचायतीच्य  काही योजना सुरू आहेत त्याचा लवकरच आढावा घेऊन कर्मचारी व पदाधीकारी यांच्या मदतीने  अडचणी सोडवण्यावर भर दिला जाईल अशी ग्वाही यावेळी नूतन नगराध्यक्षा लतादेवी सिद यांनी दिली.  

No comments:

Post a Comment

Advertise