Type Here to Get Search Results !

आटपाडीत उद्या पडळकर यांच्या प्रचारार्थ बैठक कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे : जयवंतराव सरगर

आटपाडीत उद्या पडळकर यांच्या प्रचारार्थ बैठक
कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे : जयवंतराव सरगर
 माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी : सांगली लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ मंगळवार दिनांक  9 एप्रिल रोजी सायंकाळी  4 वाजता आटपाडी येथील जवळे मल्टीपर्पज हॉल याठिकाणी आटपाडी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून, बैठकीस आटपाडी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन युवानेते जयवंतराव सरगर यांनी केले आहे.
वंचित बहुजन आघाडीमधून गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यांच्या प्रचाराचा जोर अधिक वाढला आहे. आटपाडी तालुका यांची मायभूमी असलेल्या भागात मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता आटपाडी येथील जवळे मल्टीपर्पज हॉलमध्ये तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये स्वतः उमेदवार गोपीचंद पडळकर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.  या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी या बैठकीला वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन युवा नेते जयवंतराव सरगर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies