Type Here to Get Search Results !

दिव्यांग मित्रांना मिळणार ४५ लाखांचे मोफत साहित्य : सभापती मंदाताई करांडे ; साहित्य ग्रामपंचायतीकडे वर्ग

दिव्यांग मित्र अभियानमधील साहित्य ग्रामसेवकांना वाटप करताना, सभापती मंदाताई करांडे, भाजप नेते राजाराम गरूड, राजेंद्र मोहिते, अमर यादव आदी.

दिव्यांग मित्रांना मिळणार ४५ लाखांचे मोफत साहित्य
सभापती मंदाताई करांडे ; साहित्य ग्रामपंचायतीकडे वर्ग
 माणदेश एक्सप्रेस न्यूज
कडेगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील दिव्यांग मित्रांना उपयुक्त असलेले ४५ लाख रुपये किंमतीचे साहित्य वाटप करण्यासाठी ग्रामसेवकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरचे साहित्य आज शनिवार आणि रविवार असे दोन दिवसात वाटप केले जाणार असल्याची माहिती पंचायत समितीच्या सभापती मंदाताई करांडे यांनी दिली.
सभापती करांडे म्हणाल्या, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविलेल्या दिव्यांग मित्र अभियान राबविले होते. या अभियानमध्ये जिल्ह्यात ३४ हजार दिव्यांगमित्रांची नोंदणी झाली होती. त्यानंतर प्रत्येक तालुक्यात दिव्यांग मित्रांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली होती. तपासणीत शिबिरात सहभागी झालेल्या दिव्यांग मित्रांना उपयुक्त असलेले साहित्य जिल्हा परिषदेकडून देण्यात येणार होते. यासाठी संग्रामसिंह देशमुख यांनी पाठपुरावा केला होता.
त्यानुसार जिल्हा परिषदेकडून अंधासाठी मोबाईल फोन, तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, साधी काठी, अंधासाठी स्मार्ट कॉन, एडिएल किट, अपंगासाठी बुट, कुबडी, कृत्रिम पाय, कृत्रिम हात, श्रवणयंत्र, व्हीलचेअर लहान, मंतीमंदासाठी शौच खुर्ची, हंण्डस्टीक असे तालुक्यातील ८५४ लाभार्थ्यांसाठी ३ हजार २५४ नग साहित्य पंचायत समितीकडे प्राप्त झाले आहे. ते सर्व साहित्य शुक्रवार दि.१ रोजी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांच्या ताब्यात दिले आहे. सदरचे साहित्य आज शनिवार आणि रविवारी दिव्यांग मित्रांना वाटप केले जाणार आहे.
यावेळी गटविकास अधिकारी राहुल देसाई, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य राजाराम गरूड, युवानेते राजेंद्र मोहिते, सासपडे गावचे सरपंच डॉ.सतिश जाधव, अमर यादव, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश गढळे, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी सुनिल लोहार, आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी संजय खुर्द यांच्यासह सर्व आधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies